सिल्लोड, (प्रतिनिधी) : वंश, जात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग इत्यादींच्या आधारावर मानवाला वंचित ठेवता येत नाही. मानवी हक्क हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. त्या हक्कांची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश होतो. मानवी हक्क हे मानवाला जन्मापासूनच उपलब्ध आहेत.
या सर्व बाबींची जनजागृती या उद्देशाने भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात मानवी हक्क दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी मानवी हक्क दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त करून प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती मिळवून दिली. समाजातजीवन जगत असताना आपण सर्वांनी आपल्या मानवी हक्कांविषयी जागृत राहून वाटचाल केली पाहिजे.
आपल्या हक्कांचा उपभोग घेत असताना इतरांच्या हक्कांना बाधा येणार नाही असे वर्तन केले असावे. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी मानवी हक्क संदर्भात पोस्टर्स तयार करून तशा घोषणा माध्यमातून जनजागृती केली. या विद्यार्थ्यांमध्ये हर्षल साळवे, कार्तिक ढोरमारे, प्रशांत गवळी, भक्ती काकडे, संकेत जाधव, जाधव, समीक्षा गवळी, अनन्या पाटील यांना शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षक वृंद, शालेय वाहनचालक मालक यांची उपस्थिती होती.














